Advertisement

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व


अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व
SHARES

पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणेकडं भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांनाही या संघात स्थान देण्यात आले नाही तर मुंबईच्या रोहित शर्माऐवजी निवड समितीने करुण नायरला संधी दिली आहे.


कोहली कौंटी खेळणार

या वर्षअखेरीस होणाऱ्या भारतीय संघाच्या प्रदीर्घ इंग्लिश दौऱ्याची जय्यत तयारी व्हावी, यासाठी विराट कोहलीने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिपमध्ये कोहली सरे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत खेळू शकणार नाही. चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा हे सुद्धा अनुक्रमे यॉर्कशायर आणि ससेक्स संघाकडून कौंटी क्रिकेट खेळणार आहेत.


श्रेयस अय्यरकडे अ संघाची धुरा

सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व सांभाळणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरला कसोटी संघात स्थान मिळाले नसले तरी त्याच्याकडे भारताच्या अ संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडिज अ संघ यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत तो भारताच्या अ संघाचे कर्णधारपद भूषवेल.


भारताचा कसोटी संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा