Advertisement

विराट माणूस अाहे मशीन नाही - शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं


विराट माणूस अाहे मशीन नाही - शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं
SHARES

विराट कोहलीला मानेची दुखापत झाल्यानं त्यानं इंग्लिश कौंटी क्रिकेटमधून माघार घेतली अाहे. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत सजग असलेल्या कोहलीवर सध्या टीकेचा भडिमार सुरू अाहे. पण भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटची पाठराखण केली अाहे. विराट हा माणूस अाहे, मशीन नाही, अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सुनावलं अाहे.


विराटलाही अारामाची गरज

विराट कोहली यालाही अाराम मिळण्याची नितांत अावश्यकता अाहे. विराट हा काही मशीन नाही, जो फक्त खेळतच राहील. विराट हे काही मशीन नाही, ज्यामध्ये इंधन भरलं की ते सुरू होईल, असं शास्त्री यांनी सांगितलं.


सरे क्लबचं होणार नुकसान

विराट कोहलीला दुखापत झाल्यामुळेच तो सरे या क्लबकडून कौंटी क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही. पण त्याच्या या निर्णयाचा अादर करायला हवा, असं सरे क्लबचे क्रिकेट संचालक अॅलेक्स स्टीव्हर्ट यांनी सांगितलं. मात्र विराट खेळणार नसल्यामुळे सरे क्लबचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अाहे. अनेक चाहत्यांनी तिकिटाचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी केली अाहे.


विराटवर उपचार सुरू

विराटला स्लिप डिस्क म्हणजेच मणक्याला दुखापत झाल्याच्या बातम्याही अाल्या होत्या. पण त्याला मानेला लचक भरल्याचे बीसीसीअायने स्पष्ट केलं अाहे. त्याच्या दुखापतीवर बीसीसीअाच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले अाहेत. अाता विराटची १५ जूनला फिटनेस चाचणी होणार अाहे. त्यानंतरच अायर्लंड अाणि इंग्लंड दौऱ्यात त्याच्या समावेशाचा निर्णय घेण्यात येईल.


हेही वाचा -

विराटच्या मानेत लचक, बीसीसीआयचा खुलासा

विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज – क्विंटन डी काॅक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा