Advertisement

विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज – क्विंटन डी काॅक


विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज – क्विंटन डी काॅक
SHARES

यंदाच्या अायपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी चांगली झाली नसली तरी अारसीबीचा कर्णधार विराट कोहलीची मात्र क्विंटन डी काॅक यानं मुक्तकंठानं प्रशंसा केली अाहे. मैदानात विराट कोहलीसारखा खेळाडू मी पाहिला नाही. सर्वोत्तम कामगिरी करणे अाणि संघाला जिंकून देणे, यासाठी तो धडपडत असतो. त्याची खेळाप्रतिची निष्ठा, त्याचा अाक्रमक स्वभाव, सर्वोत्तम कामगिरी करण्याची ईर्ष्या, यामुळे विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू अाहे, असं मत दक्षिण अाफ्रिकेचा अाणि अारसीबीचा फलंदाज क्विंटन डी काॅक यानं व्यक्त केलं.


भारताची गोलंदाजी सर्वोत्तम

क्विंटन डी काॅक यानं तयार केलेल्या स्पिंटेक या स्पिनिंग मॅटचं अनावरण करताना तो बोलत होता. भारतात या स्पिंटेक मॅटचे हक्क अोमटेक्सकडे अाहेत. तो म्हणाला की, भारतासाठी अागामी इंग्लंड दौरा अाव्हानात्मक असेल. तरीही भारताकडे भुवनेश्वर कुमार, बुमरा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, इशांत शर्मासारखे दमदार गोलंदाज अाहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज या तगड्या गोलंदाजीसमोर नक्कीच शरणागती पत्करेल.


दिवस-रात्र कसोटीत भारताने खेळावे

गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार्या दिवसरात्र कसोटीत प्रत्येक संघाने सहभागी व्हावे. या कसोटी सामन्यात काही त्रूटी असल्या तरी ही संकल्पना खूप चांगली अाहे. भारतानेही या कसोटी सामन्यात खेळायला हवे, असे त्याने सांगितले.


हेही वाचा -

म्हणून नकोय विराट-अनुष्काला वरळीतला फ्लॅट!

बटर चिकन, मुघलई चिकन माझी फेव्हरिट डिश - विराट कोहली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा