Advertisement

विराटच्या मानेत लचक, बीसीसीआयचा खुलासा

विराट कोहलीला स्लिप डिस्कचा (मणक्याचं दुखणं) त्रास होत असल्याने तो इंग्लंडमधील सरे काऊंटी क्रिकेट क्लबकडून मॅच खेळू शकणार नाही, या वृत्ताचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने गुरूवारी खंडन केलं.

विराटच्या मानेत लचक, बीसीसीआयचा खुलासा
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्लिप डिस्कचा (मणक्याचं दुखणं) त्रास होत असल्याने तो इंग्लंडमधील सरे काऊंटी क्रिकेट क्लबकडून मॅच खेळू शकणार नाही, या वृत्ताचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने गुरूवारी खंडन केलं. विराटला असा कुठलाही आजार नसून त्याला केवळ मानेत चमक (नेक स्प्रेन) असल्याचा खुलासा 'बीसीसीआय'ने केला आहे.


का खेळणार काऊंटी क्रिकेट?

'आयपीएल'चा हंगाम संपल्यानंतर विराट काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार होता. भारत अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यामुळे विराटने इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं.


सरे क्रिकेट क्लबच्या ट्विटर अकाऊंटवर यासंबंधीची माहिती देण्यात आली होती. तर मला काऊंटी क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी सरे क्रिकेट क्लबचा आभारी आहे. माझं काऊंटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न होतं. ते सत्यात उतरणार असल्याची प्रतिक्रीया कोहलीने दिली होती. स्थानिक काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये विराट सरेकडून ३ सामने खेळणार आहे. परंतु या आजारामुळे कदाचित त्याची ही संधी मुकण्याची चिन्हे आहेत.


डॉक्टरांनी काय दिला सल्ला?

मिळालेल्या वृत्तानुसार, पाठिच्या दुखण्याने त्रस्त विराट बुधवारी खार येथील एका रुग्णालयात गेला होता. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला स्लिप डिस्कचा त्रास झाल्याचं सांगितलं. दुखणं बरं होण्याआधी क्रिकेट खेळल्यास दुखापतीत वाढ होण्याची शक्यता असल्याने डाॅक्टरांनी त्याला काही काळ क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला आहे.


बीसीसीआयचा खुलासा

विराट कोहलीला स्लिप डिस्कचा आजार नसून, त्याच्या मानेमध्ये चमक (नेक स्प्रेन) आली आहे. त्यामुळे विराट काऊंटीच्या क्रिकेट दौऱ्यात घट करण्यात येणार आहे. विराट फक्त २ दिवसीय लढती खेळू शकणार आहे. मात्र रॉयल लंडन चषक स्पर्धेतील ५ सामने तो खेळू शकणार नसल्याचं, बीसीसीआयच्या एका आधिकाऱ्याने सांगितलं आहे.



हेही वाचा-

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व

कसोटीतून 'टाॅस' होणार हद्दपार?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा