परदेश दौऱ्यावर नेता येईल पत्नी, प्रेयसी, विराटच्या मागणीला बीसीसीआयचा होकार

परदेश दौऱ्यात खेळाडूंना पत्नीसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय) कडे केली होती. या मागणीला 'बीसीसीआय'ने परवानगी दिली आहे. त्यानुसार आता क्रिकेटपटूंना परदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाता येणार आहे.

एका अटीवर परवानगी

'बीसीसीआय'च्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला आपल्या पत्नीला २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ सोबत ठेवता येत नाही. या नियमात बदल करण्यात यावा, अशी मागणी विराटने 'बीसीसीआय' आणि क्रिकेट प्रशासनाला केली होती.

पहिले १० दिवस नाहीच

विराट कोहलीच्या या मागणीला 'बीसीसीआय'ने परवानगी दिली असली, तरी एक अट घातली आहे. ती म्हणजे परदेशी दौऱ्याचे पहिले १० दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला सोबत नेता येणार नाही. यानंतर ती क्रिकेटपटूसोबत राहू शकते.


हेही वाचा-

विराट म्हणतो, मला पत्नीसोबत राहू द्या!

'वन डे'त विराटचं कमबॅक, पंतलाही चान्स!


पुढील बातमी
इतर बातम्या