Advertisement

विराट म्हणतो, मला पत्नीसोबत राहू द्या!

बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला आपल्या पत्नीला २ आठवड्यांपेक्षा जास्त सोबत ठेवता येत नाही. या नियमात बदल करण्यात यावा, अशी मागणी विराटने बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासनाला केली.

विराट म्हणतो, मला पत्नीसोबत राहू द्या!
SHARES

परदेश दौऱ्यात खेळाडूंना पत्नीसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी, मागणी कर्णधार विराट कोहली यानं नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय) कडे केली आहे. याबाबत विराट कोहलीनं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.


बीसीसीआयचा नियम काय?

बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला आपल्या पत्नीला २ आठवड्यांपेक्षा जास्त सोबत ठेवता येत नाही. या नियमात बदल करण्यात यावा, अशी मागणी विराटने बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासनाला केली होती. विराटच्या विनंतीवर क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना समितीला अधिकृतरित्या पत्र लिहिण्यास सांगितलं आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय तात्काळ घेतला जाणार नसल्यामुळे या निर्णयाकडे सर्व खेळाडूंचं लक्ष लागलं आहे.


अधिकृत विनंती

बीसीसीआयच्या धोरणानुसार या निर्णयावर व्यवस्थापकांना अधिकृत विनंती करावी लागणार असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. इतर देशांच्या संघातील खेळाडू त्यांच्या पत्नीसोबत असतात. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या पत्नीसोबत राहता यावं, अशी मागणी विराटनं केली आहे.



हेही वाचा-

पृथ्वीला मराठीतून 'विराट' मंत्र

'बीसीसीआय' देणार माहिती अधिकार निर्णयाला आव्हान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा