Advertisement

पृथ्वीला मराठीतून 'विराट' मंत्र

मैदानावर अाक्रमक असलेला विराट मैदानाबाहेर दिलखुलास अाहे. मला चीअर अप करण्यासाठी त्याने माझ्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचं मोडकं मोडकं मराठी माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारं होतं.

पृथ्वीला मराठीतून 'विराट' मंत्र
SHARES

अठरा वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉ अाता कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला अाहे. त्याचा पहिलाच कसोटी सामना असल्याने त्याचं मनोबल उंचावण्याचा कर्णधार विराट कोहली प्रयत्न करत अाहे. यासाठी विराट पृथ्वीशी मराठीतून संवाद साधत अाहे.

विंडीजविरोधात कसोटी

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात अाला होता. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अाता वेस्ट इंडिजविरोधात होणाऱ्या मालिकेत पृथ्वी पहिली कसोटी खेळणार अाहे. त्यामुळे विरोट कोहलीने त्याला बुधवारी काही टिप्स दिल्याची माहिती पृथ्वीने दिली. पृथ्वीच्या मायबोलीतून म्हणजे मराठीतून विराटने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.


हास्य फुलवणारं

यासंदर्भात पृथ्वी म्हणाला की, मैदानावर अाक्रमक असलेला विराट मैदानाबाहेर दिलखुलास अाहे. मला चीअर अप करण्यासाठी त्याने माझ्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचं मोडकं मोडकं मराठी माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारं होतं. मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा विराट यात बराच फरक आहे. माझी भीती विराट आणि रवी शास्त्री सरांनी दूर केली.  ड्रेसिंग रूममध्ये ज्युनियर वा सीनियर असा फरक नसून आपण एक टीम आहोत असा सल्ला मला दोघांनीही दिला अाहे.हेही वाचा - 

बीसीसीआय' देणार माहिती अधिकार निर्णयाला आव्हान

राजकोट कसोटीतून पृथ्वी करणार टेस्टमध्ये पदार्पण
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा