Advertisement

'वन डे'त विराटचं कमबॅक, पंतलाही चान्स!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवड समितीने पहिल्या २ सामन्यांकरीता गुरूवारी सायंकाळी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात दिनेश कार्तिकऐवजी विकेटकिपर फलंदाज म्हणून ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.

'वन डे'त विराटचं कमबॅक, पंतलाही चान्स!
SHARES

विश्रांती घेण्यासाठी आशिया कपमध्ये सहभागी न झालेला भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने वन डेत पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवड समितीने पहिल्या २ सामन्यांकरीता गुरूवारी सायंकाळी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात दिनेश कार्तिकऐवजी विकेटकिपर फलंदाज म्हणून ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.


कुठे होणार मॅच?

भारतीय दौऱ्यावर आलेला वेस्ट इंडिजचा संघ भारतासोबत २ टेस्ट मॅचसोबतच ५ वन डे आणि ३ टी २० मॅच खेळणार आहे. दुसरी टेस्ट मॅच संपल्यानंतर २१ आॅक्टोबरपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. वन डे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी इथं खेळवण्यात येईल. तर दुसरा सामना २४ आॅक्टोबरला विशाखापट्टणम इथं होणार आहे.

या २ वन डे साठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने गुरूवारी संघनिवड केली.


भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, अंबाती रायडू, मनिष पांडे, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलिल अहमद, शार्दुल ठाकूर



हेही वाचा-

वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!

भारत वि. वेस्ट इंडिज: दुसऱ्या टेस्टसाठी संघ जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा