मुंबईकर अजिंक्य रहाणेचं भारतीय संघात कमबॅक

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

यंदाच्या अायपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही अाणि परदेशात चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून अोळख असूनही मुंबईकर अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या वनडे अाणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात अालं नव्हतं. मात्र अाता अजिंक्य रहाणेनं इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवलं अाहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय संघात अजिंक्य रहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात अाली अाहे. कसोटी संघात रिषभ पंत हा नवा चेहरा दिसणार असून मोहम्मद शमीही भारतीय संघात परतला अाहे. भारतीय संघ १ अाॅगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार अाहे.

शार्दूल ठाकूरचीही निवड

इंग्लंड दौऱ्यात सध्या चमक दाखविणारा मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर याचीही भारताच्या कसेटी संघात निवड करण्यात अाली अाहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याचा समावेश करण्यात अाला असला तरी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच दुसऱ्या कसोटीपासून त्याचा संघनिवडीसाठी विचार करण्यात येईल. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अाणि कुलदीप यादव या फिरकीपटूंना संधी दिल्यामुळे युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळू शकले नाही.

असा असेल भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, अार. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर.


हेही वाचा -

अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?

शार्दूल ठाकूरला लाॅटरी, इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे संघात निवड


पुढील बातमी
इतर बातम्या