हार्दिक पंड्याला मँचेस्टर युनायटेडकडून मिळालं 'हे' गिफ्ट!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

मुंबई इंडियन्स अाणि भारताचा अष्टपैलू खेळाडू याच्या कर्तृत्वाची अाणि फुटबाॅलप्रेमाची दखल मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश प्रीमिअर लीगमधल्या बलाढ्य क्लबनं घेतली अाहे. हार्दिक पंड्याच्या फुटबाॅल प्रेमाखातर मँचेस्टर युनायटेडनं त्याला मौल्यवान गिफ्ट पाठवलं अाहे. हार्दिक पंड्यानं खुद्द ट्विटरवरूनच अापल्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली अाहे.

जर्सीची भेट

मुंबईत राहणाऱ्या हार्दिक पंड्याला जगातील सर्वात श्रीमंत क्लब अशी अोळख असलेल्या मँचेस्टर युनायटेडमधील दिग्गज खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली जर्सी भेट म्हणून देण्यात अाली अाहे. "गल्फ अाॅईल इंडिया अाणि मँचेस्टर युनायटेडचे या अनोख्या गिफ्टबद्दल खूप खूर अाभार. हे गिफ्ट मी कधीही विसरू शकणार नाही," असं हार्दिक पंड्यानं अापल्या ट्विटर पेजवर म्हटलं अाहे.

 

इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

पंड्या सध्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज होत असतानाच इंग्लिश फुटबाॅलमधील जायंट समजल्या जाणाऱ्या क्लबनं त्याला मौल्यवान भेट दिल्यामुळे पंड्याचा अानंद गगनात मावेनासा झाला अाहे. भारताच्या अागामी इंग्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात अाहे.


हेही वाचा -

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले

कसोटी क्रिकेट हे आईच्या हातचं जेवण - बलविंदर सिंग संधू

पुढील बातमी
इतर बातम्या