IPL 2021 : CSK ला धक्का, आयपीएलमधून 'ह्या' खेळाडूने घेतली माघार

आयपीएलच्या १४ व्या हंगामाची ९ एप्रिलला होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच  महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. सीएसके (csk) चा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

जोश हेझलवूडने वैयक्तिक कारणामुळे अचानक स्पर्धेतून माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे. हेझलवूडने सांगितलं की, या वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस मालिकेचा विचार करुन हा निर्णय आहे. मी जवळपास मागील दहा महिन्यांपासून घरापासून दूर आहे. त्यामुळे कुटुंबियांसोबत आपल्याला वेळ घालवायचा आहे. पुढे हिवाळ्यात आम्हाला खूप क्रिकेट खेळायचं आहे. वेस्टइंडीजचा मोठा दौरा आहे, त्यानंतर बांगलादेश दौरा, टी-२० वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस मालिका. त्यामुळे १२ महीने खूप व्यस्त असणार आहेत. अशात स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या तंदरूस्त ठेवण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. यासाठी आयपीएल २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

यंदाच्या आयपीएलमधून माघार घेणारा हेझलवूड तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या संघातून जोश फिलिप आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघातून मिशेल मार्श यांनीही मालिकेतून माघार घेतली आहे. 


हेही वाचा -

  1. IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंत

  1. IPL 2021 : आयपीएलच्या १४ व्या मोसमात नवे नियम; जाणून घ्या काय आहेत?

पुढील बातमी
इतर बातम्या