Advertisement

IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या मोसमात नवे नियम; जाणून घ्या काय आहेत?

बीसीसीआयनं सर्व ८ ही संघांना मेल पाठवला आहे. या मेलमध्ये नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे.

IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या मोसमात नवे नियम; जाणून घ्या काय आहेत?
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या मोसमाची अनेक क्रिकेट चाहते वाट बघत आहेत. आता आयपीएल सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांचा थरार आपल्याला मिळणार आहे. पण आयपीएलच्या या आगामी मोसमात क्रिकेट चाहत्यांना काही नवे नियम बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी बीसीलीआय बोर्डाने नवे नियम जारी केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक संघाला ९० मिनिटात आपला डाव संपवावा लागेल. तसेच बोर्डाने सॉफ्ट सिग्नल हटवण्याचा निर्णयही घेतला आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमांनुसार चौथ्या अंपायरची ताकद वाढणार आहे.

बीसीसीआयनं सर्व ८ ही संघांना मेल पाठवला आहे. या मेलमध्ये नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक संघानं ९० मिनिटात डाव आटोपायला हवा. याआधी प्रत्येक डावाची २० वी ओव्हर ९० व्या मिनिटाला सुरु करण्याबाबतचा नियम होता. मात्र, आता वेळेत बदल करण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार एका तासाला प्रत्येक संघाला सरासरी १४.११ ओव्हर टाकाव्या लागतील. पण यात टाईम-आऊटचा समावेश केला जाणार नाही. खेळासाठी ८५ मिनिट तर टाईम आऊटसाठी ६ मिनिट दिले जातील. कोणताही संघ जर वेळ वाया घालवत असेल तर फोर्थ अंपायरची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. अशावेळी फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार फोर्थ अंपायरला देण्यात आला आहे. याशिवाय शिक्षा म्हणून ओव्हर-रेट नियम लागू करण्याचा अधिकार चौथ्या अंपायरला देण्यात आला आहे.

थर्ड अंपायरबाबतचा निर्णय

ऑन-फिल्ड अंपायरच्या निर्णयाचा तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर काहीच फरक पडणार नाही, असंही बीसीसीआयनं सांगितलं आहे. याचाच अर्थ आता मैदानावरील अंपायरला मदतीसाठी थर्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची गरज राहणार नाही. हा निर्णय अंपायरिंगच्या हितासाठी घेण्यात आलाय जेणेकरुन थर्ड अंपायरला निर्णय जाहीर करताना कोणतीही अडचण येऊ नये. अंपायरच्या निर्णयावरुन निर्माण होणाऱ्या वादांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा