मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर

सध्या मुंबईच्या सिनियर संघाच्या सराव शिबिरात केलेल्या खेळाडूंच्या निवडीबद्दलचा वाद सध्या जोरात गाजत अाहे. माजी क्रिकेटपटू अजित अागरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं अाधी २७ खेळाडू निवडले होते. पण गेल्या मोसमात चांगली कामगिरी करूनही डावलले गेलेल्या ७ खेळाडूंना शिबिरासाठी बोलावण्यात अालं. या निर्णयावर टीका होत असतानाच भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मात्र निवड समितीवर जोरदार ताशेरे अोढले अाहेत. मुंबईच्या इतिहासात असं याअाधी कधीही घडलं नव्हतं. निवड समितीनं याअाधी निवडलेल्या खेळाडूंनाच यावेळीही संधी दिली अाहे, हे सर्वात दुर्दैवी अाहे, अशा शब्दांत वेंगसरकर यांनी निवड समितीवर टीकास्त्र सोडलं अाहे.

तर पदाचे राजीनामे द्या

जर खेळाडू चांगली कामगिरी करत असतील अाणि तरीही त्यांना डावलले जात असेल तर हे संपूर्णपणे निवड समितीचं अपयश अाहे. स्थानिक सामने पाहण्यासाठी निवड समितीकडे वेळ नाही, हेच त्यातून सिद्ध होत अाहे. त्यामुळे जर निवड समितीला अापली कामगिरी योग्यपणे पार पाडता येत नसेल तर त्यांनी अापल्या पदाचा राजीनामा द्यावा. निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळत अाहे. जर खेळाडूंना दमदार कामगिरी करूनही संधी मिळत नसेल तीही निवड समितीच्या चुकीमुळे तर यासारखे दुर्दैव दुसरे नाही. योग्य वेळी खेळाडूंना चांगली संधी मिळायलाच हवी. अन्यथा त्यांची कारकीर्द बरबाद होईल, अशी चिंताही वेंगसरकर यांनी व्यक्त केली.

पहिल्यांदाच नामुष्कीची वेळ

स्थानिक सामने पाहण्यासाठी निवड समितीकडे वेळ नसेल तर त्यांनी या पदावर राहणे योग्य नाही. संपूर्ण मोसमात चांगली कामगिरी करूनही खेळाडूंना मुंबई संघातून खेळण्याची संधी मिळत नसेल तर ते निराश होतील. पण हा फियास्को मुंबई क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडला अाहे, असंही वेंगसरकर यांनी सांगितलं. अागरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीत माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, जतीन परांजपे अाणि सुनील मोरे या सदस्यांचा समावेश अाहे.


हेही वाचा -

विराट कोहलीला संधी देऊन मी नोकरी गमावली - दिलीप वेंगसरकर

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले


पुढील बातमी
इतर बातम्या