राहुल द्रविडचा 'हाॅल अाॅफ फेम’मध्ये समावेश

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल अायसीसीच्या हाॅल अाॅफ फेममध्ये समावेश करण्यात अाला अाहे. विशेष म्हणजे, जगाला अनेक महान खेळाडू देणाऱ्या भारताच्या फक्त पाचच खेळाडूंना या यादीत स्थान मिळालं अाहे. द्रविड हा हाॅल अाॅफ फेममध्ये स्थान मिळवणारा भारताचा पाचवा क्रिकेटपटू ठरला अाहे. द्रविडने अापल्या कारकीर्दीत १६४ कसोटीत १३,२८८ धावा तर ३४४ वनडेत १०,८८९ धावा केल्या अाहेत.

 

भारताचे पाच जण यादीत

द्रविडअाधी भारताच्या चार क्रिकेटपटूंनाच हाॅफ अाॅफ फेम यादीत स्थान मिळालं होतं. बिशनसिंग बेदी, सुनील गावस्कर, कपिलदेव अाणि अनिल कुंबळे व राहुल द्रविड हे पाच भारतीय क्रिकेटपटू या यादीत अाहेत. अाॅस्ट्रेलियाच्या २५ क्रिकेटपटूंनी हा मान पटकावला अाहे.

अायसीसीच्या हाॅल अाॅफ फेममध्ये स्थान मिळणे, ही अभिमानाची गोष्ट असते. दिग्गज क्रिकेटपटूंच्या पंक्तीत स्थान मिळविण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे उद्दिष्ट असते. ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो ते माझे सहकारी, प्रशिक्षक अाणि पदाधिकारी यांच्यासह हितचिंतक अाणि माझ्या चाहत्यांचा मी अाभारी अाहे. मला कायम पाठिंबा दिल्याबद्दल मी केएससीए अाणि बीसीसीअायचेही अाभार मानतो.

- राहुल द्रविड, भारताचा क्रिकेटपटू


हेही वाचा -

भारतासाठी वर्ल्डकप जिंकलो हाच अभिमानास्पद क्षण - पृथ्वी शॉ

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले


पुढील बातमी
इतर बातम्या