Advertisement

भारतासाठी वर्ल्डकप जिंकलो हाच अभिमानास्पद क्षण - पृथ्वी शॉ

भारतासाठी विश्वचषक जिंकू शकलो, हाच माझ्यासाठी सर्वात अभिमानास्पद क्षण आहे, अशा शब्दांत विश्वविजेत्या भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार पृथ्वी शाॅ याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारतासाठी वर्ल्डकप जिंकलो हाच अभिमानास्पद क्षण - पृथ्वी शॉ
SHARES

भारतासाठी खेळणं हा माझ्यासाठी सर्वात मौल्यवान क्षण होता. गेल्या एक-दीड वर्षांपासून आम्ही कठोर मेहनत घेत होतो. प्रॅक्टिस मॅचदरम्यान किंवा मीटिंगमध्ये आम्ही रणनीती आखायचो. त्याचीच अंमलबजावणी आम्ही स्पर्धेदरम्यान केली. याच जोरावर भारतासाठी विश्वचषक जिंकू शकलो, हाच माझ्यासाठी सर्वात अभिमानास्पद क्षण आहे, अशा शब्दांत विश्वविजेत्या भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार पृथ्वी शाॅ याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
विरार ते U 19 विश्वचषकापर्यंतचा प्रवास 

विरारवरून क्रिकेट खेळण्यासाठी येताना ट्रेनमघून धक्के खात २-३ तासांचा प्रवास करायचो. अशा खडतर प्रवासातही एकाग्रता ढळली नाही, याचं सर्व श्रेय माझ्या वडिलांना जातं. ते सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आम्ही खूप परिश्रम घेतले. U 19 संघात स्थान मिळवण्यासाठी मी कठोर मेहनत घेत होतो. या संघाचा एक भाग बनणं आणि कर्णधार म्हणून विश्वचषक उंचावणं हा आनंद मी शब्दांत मांडू शकत नाही, असंही मुंबईचा वंडरबाॅय पृथ्वी शाॅने सांगितलं.


पाकिस्तानविरुद्ध कोणतीही रणनीती नव्हती- द्रविड

उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तानविरुद्ध असला तरी या सामन्यासाठी आम्ही कोणतीही रणनीती आखली नव्हती. याआधी आशिया चषक आणि अन्य एका स्पर्धेत आम्हाला पाकिस्तानविरुद्ध खेळता आलं नव्हतं. त्यामुळे भारत-पाक सामन्याचा थरार काय असतो, तो या खेळाडूंनी अनुभवला. विश्वचषक पटकावल्याने प्रशिक्षक म्हणून मला खूपच आनंद झाला आहे, अशा शब्दांत U 19 संघाचा प्रशिक्षक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांने भावना व्यक्त केल्या.हेही वाचा-

U-19 वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा