२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात

कोरोना संकटामुळे अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आता भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. २०२१ सालचा टी-२० वर्ल्ड कप ठरल्याप्रमाणे भारतातच होणार आहे. तर २०२२ सालचा टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होईल.


शुक्रवारी आयसीसीची महत्वाची बैठक झाली आणि यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये भारतात टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील टी-२० वर्ल्डकप २० झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये ही स्पर्धा होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होऊ शकणार नाही. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्यात आला होता. 

याशिवाय २०२३ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ दरम्यान होणारा महिलांचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कपही २०२२ सालापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे भारतात मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली. अखेर ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या