IND vs ENG : कोहलीनं जाहीर केली सलामीची जोडी

इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले असून, भारताचा कर्णधार विराट कोहलीनं संघाची सलामीची जोडी कोण असेल, हे जाहीर केलं आहे. त्यामुळं आता रोहित शर्माबरोबर सलामीला भारताचा कोणता फलंदाज येणार, हे निश्चित झालं आहे.

'रोहित शर्मा आणि शिखर धवन हे पहिल्या वनडेमध्ये सलामीला येतील, हे निश्चित झाले आहे. जेव्हा वनडे क्रिकेटसाठी संघ निवडण्याची वेळ येते, तेव्हा मनामध्ये कुठलाही संभ्रम नसतो. कारण रोहित आणि धवन हे गेल्या काही वर्षांपासून चांगली सलामी संघाला देत आहेत. गेल्या सामन्यात मी सलामीला आलो होतो. जर सूर्यकुमार यादवला बढती द्यायची असेल किंवा वरच्या स्थानावर खेळवायचे असेल तर त्यासाठी काही प्रयोग नक्कीच करावे लागतील', असं विराट कोहली यानं स्पष्ट केलं.

'रोहित आणि मी आतापर्यंत फलंदाजीचा चांगला अनुभव घेतला आहे. आम्ही एकत्रपणे बरीच फलंदाजी केली आहे. पण यापुढे आम्ही दोघे सलामीलाच येऊ, हे मात्र सांगता येऊ शकत नाही. सर्व स्थानांवर फलंदाजी करता यावी, यासाठी मी ही गोष्ट करत आहे. कारण मी जर सलामीला येऊ शकलो तर सूर्यकुमारसारख्या फलंदाजाला न्याय मिळू शकेल किंवा वरच्या स्थानावर फलंदाजी करता येऊ शकेल. त्यामुळे कोणतीही भूमिका निभावण्यासाठी मला सक्षम असायला हवे, असे मलातरी वाटते', असंही विराट म्हणाला.


हेही वाचा

मध्य रेल्वेची ऑटोमोबाईल उत्पादनांची विक्रमी वाहतूक

एसटी 'सीएनजी' इंधनावर चालविण्याचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या