Advertisement

मध्य रेल्वेची ऑटोमोबाईल उत्पादनांची विक्रमी वाहतूक


मध्य रेल्वेची ऑटोमोबाईल उत्पादनांची विक्रमी वाहतूक
SHARES

मध्य रेल्वेनं क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास युनिट स्थानिक उद्योगांसह नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे मार्केटिंग करतात आणि त्यांच्या मागण्यांचा विश्लेषण करतात. अशा उपक्रमांत मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा, मेसर्स टाटा मोटर्स आणि मेसर्स मारुती उद्योग इत्यादी प्रमुख मोटार वाहन उद्योगांशी कार, पिक-अप व्हॅन, ट्रॅक्टर, जीप इत्यादीच्या वाहतुकी संदर्भात बैठका आयोजित केल्या गेल्या.

मध्य रेल्वेची चालू आर्थिक वर्षात ऑटोमोबाईल उत्पादनांची विक्रमी वाहतूक झाली आहे. परिणामी, वाहन उद्योग रेल्वेने वाहतुकीसाठी अधिक रुची दाखवीत आहेत आणि इच्छुक आहेत. चालू आर्थिक वर्षात मोटारींच्या वाहतुकीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते. मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड स्टेशन, सोलापूर विभागातील बाळे स्टेशन व नागपूर विभागातील अजनी स्थानक येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये रेल्वेने ३२ रेक लोड केले आहेत तर गेल्या वर्षीच्या याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२० मध्ये १२ रेक लोड केले होते. म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ऑटोमोबाईलच्या २४६ रेकची लोडिंग झाली आहे तर गतवर्षीच्या याच कालावधीत म्हणजे एप्रिल – २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ११८ रेक लोड झाले. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ दिसून आली. गेल्या वर्षभरात ऑटोमोबाईलची वाहतूक देशाच्या विविध भागात केली गेली आणि बांगलादेशात निर्यातही केली गेली.

रेल्वेच्या या उपक्रमामुळे मौल्यवान इंधनाच्या बचतीसह कार्बन फूटप्रिंटची बचत होते. ऑटोमोबाईल उत्पादकांशी व्यवसाय विकास युनिटच्या संवादादरम्यान, त्यांच्या सूचनांचेही स्वागत केले गेले. या दिशेने, मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने ऑटोमोबाईल वाहनांना सहजपणे लोड करण्यासाठी व वाहून नेण्यासाठी प्रोटोटाइप कोच विकसित केला आहे आणि उत्पादकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून वाहतुकीची गती वाढविली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा