Advertisement

एसटी 'सीएनजी' इंधनावर चालविण्याचा निर्णय

डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळं एसटी महामंडळानं त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना एलएनजी इंजिन किट बसविण्याचा निर्णय अलिकडेच घेतला होता.

एसटी 'सीएनजी' इंधनावर चालविण्याचा निर्णय
SHARES

डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळं एसटी महामंडळानं त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना एलएनजी इंजिन किट बसविण्याचा निर्णय अलिकडेच घेतला होता. आता या 'एलएनजी' म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसबरोबरच काही गाड्यांना 'सीएनजी' इंधनावर चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडं मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

इंधन खर्च कमी करण्यासाठी एसटी बस एलएनजीवर करण्याचा निर्णय झाला. प्रायोगिक तत्वावर ३ हजार बसचे एलएनजीमध्ये रुपांतर केलं जाणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आता महामंडळानं डिझेलवरील बस सीएनजीमध्येही रुपांतरीत करण्याचा नवा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला जवळपास दीड हजार बसगाड्या सीएनजीवर करण्यात येतील. त्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

अलिकडेच राज्य सरकारनं नवीन गाड्यांच्या खरेदीसाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. एलएनजीवरील बदलासाठी प्रत्येक बसमागे किमान १ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. तर सीएनजीमध्येही रुपांतरीत करण्यासाठी एसटीला स्वतंत्र खर्च करावा लागणार आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार बसगाड्या असून, त्या डिझेलवरच चालविण्यात येतात.

एसटी महामंडळाला पूर्वी दिवसाला १४ लाख लिटर डिझेल लागत होते. आता वाहतूक कमी झाल्याने दिवसाला ९ ते १० लाख लिटर लागत आहे. कोरोनानंतर त्यात पुन्हा नेहमीप्रमाणे वाढ होण्याची शक्यता आहे. एसटीच्या उत्पन्नातील सुमारे तीस टक्क्यांहून अधिक रक्कम इंधनावर खर्च होत असते. त्यामुळे एक हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होत असते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा