भारताने सीरीज जिंकली, ट्विटरवर मीम्सचा वर्षाव

न्यूझीलंड (New Zealand) मधील पाच सामन्यांच्या टी-२० (t-20) मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने  (india) न्यूझीलंडला ७ धावांनी पराभूत (Defeated) केले. या विजयासह भारताने ही मालिका ५-० ने जिंकली. भारताने प्रथमच न्यूझीलंडमध्ये टी -२० सिरीज जिंकली आहे. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये टी-२०  मालिका जिंकण्यात भारत अपयशी ठरला होता. ह्या मालिकेसह भारताला तिसऱ्यांदा परदेशात सीरीजमधील सर्व सामने जिंकण्यात यश आलं आहे. या आधी भारताने २०१९  मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध  ३-० आणि २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-० ने विजय मिळवला होता.

न्यूझीलंड  (New Zealand) मधील या निर्भेळ विजयामुळे ट्विटर (Twitter) वर अनेक प्रकारचे मिम्स व्हायरल होत आहेत. या मिम्समध्ये भारतीय खेळाडूंचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाची खिल्ली उडवली जात आहे. 

    


हेही वाचा -

न्यूझीलंडच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी फलंदाजाला खाद्यावर उचलले

मुंबईकर रोहित शर्मानं घातली 'या' नव्या विक्रमाला गवसणी


पुढील बातमी
इतर बातम्या