Advertisement

न्यूझीलंडच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी फलंदाजाला खाद्यावर उचलले

. सामना संपल्यानंतर त्याची कर्कची अवस्था एवढी बिकट होती की त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. त्यावेळी किवी संघातील दोन खेळाडूंनी कर्कला चक्क आपल्या खांद्यावर उचलून मैदानातून बाहेर नेले.

न्यूझीलंडच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी फलंदाजाला खाद्यावर उचलले
SHARES
क्रिकेट हा खेळ जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडच्या काळात याच खेळाला स्लेजिंगमुळे गालबोट लागले. मात्र असे असले तरी आजही न्यूझीलंडचा संघ हा खेळ भावना जपणारा संघ म्हणून ओळखला जातो. एकीकडे सिनियर पुरुष संघ आपल्या खेळीने चाहत्यांचे मन जिंकत असतात तर, दुसरीकडे न्यूझीलंड अंडर-१९ संघाने असे काही केले की सर्वच त्यांचे कौतुक करत आहेत.
हेही वाचाः- DHFL चे कपिल वाधवान रुग्णालयात, तर विकासक सुधाकर शेट्टींच्या घरावर ईडीचे छापे
दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये सध्या सर्व संघ उपांत्य फेरीची तयारी करत आहेत. यात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात किवींनी सर्वांचे मन जिंकले. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या कर्क मॅकेन्झीने ९९ धावा केल्या. पायाला दुखापत झाल्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन तो मैदानाबाहेर गेला. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये तो पुन्हा मैदानात परतला. वेस्ट इंडिजकडून बाद करण्यात आलेला तो शेवटचा फलंदाज होता. सामना संपल्यानंतर त्याची कर्कची अवस्था एवढी बिकट होती की त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. त्यावेळी किवी संघातील दोन खेळाडूंनी कर्कला चक्क आपल्या खांद्यावर उचलून मैदानातून बाहेर नेले. 
 हेही वाचाः- महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांची सुप्रीम कोर्टात धाव
कर्कने ४३व्या षटकात १०३ चेंडूंत ९९ धावांवर नाबाद असताना पायात क्रॅम्प आल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. कर्कला क्रिस्चियन क्लार्कने बोल्ड केले. बाद झाल्यानंतर बाहेर जाताना त्याला चालताही येत नव्हते. तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आपल्या खांद्यावर उचलून घेत याला मैदानाबाहेर नेले. त्याचा व्हिडिओ आयसीसीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मात्र वेस्ट इंडिजने दिलेले २३९ धावांचे आव्हान किवींना पार करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
 हेही वाचाः- इंद्रायणी एक्स्प्रेसचा प्रवास होणार आणखी सुरक्षित
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा