Advertisement

मुंबईकर रोहित शर्मानं घातली 'या' नव्या विक्रमाला गवसणी

रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सलामीवीर (Opener) म्हणून १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

मुंबईकर रोहित शर्मानं घातली 'या' नव्या विक्रमाला गवसणी
SHARES

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारत (India) यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-२० (T-20) सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मानं (Rohit Sharma) नव्या विक्रमाला (Record) गवसणी घातली आहे. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सलामीवीर (Opener) म्हणून १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये सेडन पार्कवर (Sedan park) सुरू असलेल्या टी-२० सामन्यात ५० धावा करताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम झाला आहे. हिटमॅन रोहित शर्मानं (Hit-Man Rohit Sharma) २१९ व्या डावांत हा पराक्रम केला आहे. 

रोहित शर्माच्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) २१४ डावांत १० हजार धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना वेगवान १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिनच्या (Sachin) नावावर आहे. रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.

रोहित शर्मानं तिसऱ्या टी-२० सामन्यात तुफानी फलंदाजी केली. रोहितनं २३ चेंडूत अर्धशतक झळकावलं. रोहितनं ३ षटकार आणि ५ चौकारां मारत अर्धशतकी खेळी केली. सलामी फलंदाज रोहित शर्माचं अर्धशतक (६५) आणि कर्णधार विराट कोहली (३८) यांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित २० षटकांत ५ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली.



हेही वाचा -

कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार- उदय सामंत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा