Advertisement

महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार- उदय सामंत

विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जपली पाहिजे, त्यांना स्वातंत्र्यामागच्या बलिदानाचे महत्व कळावे, यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानंच करावी, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार- उदय सामंत
SHARES

विद्यार्थ्यांनी (Students) देशभक्तीची भावना जपली पाहिजे, त्यांना स्वातंत्र्यामागच्या बलिदानाचे महत्व कळावे, यासाठी विद्यापीठ (University) आणि महाविद्यालयातील (Colleges) सार्वजनिक कार्यक्रमाची (Events) सुरुवात ही राष्ट्रगीतानंच (National Anthem) करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant, Minister of Higher and Technical Education) यांनी दिली.

'चित्रपटगृहामध्ये (Theaters) चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्र्रगीत होतं. देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी, यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानं (National Anthem) झाली पाहिजे. आपल्या मातृभाषेचा अभिमान (Proud of mother tongue) आपल्याला असला पाहिजे. सर्व महाविद्यालयाच्या नावाचे फलक हे मराठीतच लावावेत’, अशा सूचना देखील उदय सामंत (Uday Samant) महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत.

हेही वाचा - ‘सीएए’च्या समर्थनासाठी नव्हे, तर बांगलादेशींना हाकलण्यासाठी मोर्चा- राज ठाकरे

मुंबई आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण, यांच्या संयुक्त विद्यमाने एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या (Elphinstone College) ग्रंथालयामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचं जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Acharya Balshastri Jambhekar) यांच्या तैलचित्राचं अनावरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची या महाविद्यालयात पहिले प्राध्यापक (Professor) म्हणून नियुक्ती झाली होती. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते', असं उदय सामंत यांनी म्हटलं.

हेही वाचा - 'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'

'याच महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा पत्रकारितेचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. तसंच महाविद्यालयाच्या सभागृहासाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीसाठी स्वतंत्र कुलगुरुंची (Independent Vice Chancellor) नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे’, असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर Acharya Balshastri Jambhekar आणि हिंदी पत्रकारीतेचे पितामह बाबूराव पराडकर (Baburao Paradkar) यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

एमएमआरडीए उभारणार वडाळ्यात बिझनेस हब

मनुष्यबळाअभावी बेस्टच्या १२५ गाड्या बस आगारात उभ्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा