मनुष्यबळाअभावी बेस्टच्या १२५ गाड्या बस आगारात उभ्या

बेस्टनं ४०० कंत्राटी वाहक नेमण्यासाठी निविदा काढली आहे. तसंच, ही निविदा (Tender) बुधवारी खुली करण्यात येणार आहे.

SHARE

बेस्ट उपक्रमात (BEST) मागील काही महिन्यांपासून बसगाड्यांच्या (BUS) संख्येत वाढ होत आहे. मात्र, बसगाड्यांच्या तुलनेत बेस्टकडं पुरेस मनुष्यबळ नाही. त्यामुळं बेस्टला प्रवाशांच्या (Passengers) रोषाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं आता बेस्टनं ४०० कंत्राटी वाहक नेमण्यासाठी निविदा काढली आहे. तसंच, ही निविदा (Tender) बुधवारी खुली करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं बेस्ट प्रशासनं (BEST) येत्या काही महिन्यांत कंत्राटी चालकांचीही (Contract Driver) नेमणूक करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.

बसगाड्यांची संख्या वाढत असल्यानं बेस्टला मनुष्यबळाची गरज आहे. चालक-वाहकांचं २ पाळ्यांमध्ये काम, साप्ताहिक सुट्टी, आरोग्यविषयक कारणं इत्यादींमुळं बेस्टला नियमितपणं सेवा देणं कठीण जात आहे. परिणामी दरदिवशी १२५ बसगाड्या (BUS) स्थानक आणि आगारांत उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होत नसून, उत्पन्नही बुडत आहे.

कमी मनुष्यबळाअभावी दररोज १२५ बसगाड्या बस आगार व स्थानकांत उभ्या राहत आहेत. बेस्ट उपक्रमानं भाडेकपात केल्यानंतर प्रवासी संख्या ३४ लाखांपर्यंत पोहोचली. मात्र, उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही. बेस्टनं ताफ्यात मिनी, मिडी बसगाड्याही (Mini, Midi Bus) दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ३ हजार २०० बसगाड्या आहेत. याव्यतिरिक्त २८७ भाडेतत्त्वावरील मिनी बसही दाखल करण्यात आल्या आहेत. आणखी ११३ मिनी बस फेब्रुवारीत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

बसगाड्यांची संख्या ही टप्प्याटप्यानं ६ हजार ५००, तर प्रवासी संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. दरम्यान, या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर चालक कंपनीचा आणि वाहक बेस्टचा असा नियम आहे. फेब्रुवारी महिन्यात आणखी ११३ बसगाडय़ा येणार असल्यामुळं या बसगाड्यांवरही वाहकांची गरज लागणार आहे.

चालकांची संख्याही वाढवण्याचा प्रयत्न असणार असून त्याचाही आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठीही कंत्राटी पद्धतीनं चालक नेमणे योग्य आहे का, त्याची पडताळणी करण्यात येणार असल्याचं समजतं.


हेही वाचा -

भारत बंद: कांजुरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको

ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर गुरूवारपासून धावणार एसी लोकलसंबंधित विषय
ताज्या बातम्या