Advertisement

ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर गुरूवारपासून धावणार एसी लोकल

ठाणे ते पनवेल (Thana to vashi-Panvel) ट्रान्स हार्बर (Transe Harbour) मार्गावर पहिली एसी लोकल ३१ जानेवारीपासून नियमितपणे धावणार आहे.

ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर गुरूवारपासून धावणार एसी लोकल
SHARES

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे ते पनवेल (Thana to vashi-Panvel) ट्रान्स हार्बर (Transe Harbour) मार्गावर पहिली एसी लोकल ३१ जानेवारीपासून नियमितपणे धावणार आहे. ३० जानेवारी रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) दिल्लीतून (Delhi) व्हिडीओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याशिवाय, मध्य रेल्वेवरील (Central Railway) ही पहिली एसी लोकल (AC Local) चालवण्याचे सारथ्य महिला मोटरमनकडे देण्यात येणार आहे. त्यानुसार, मनीषा म्हस्के यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतं. 

एसी लोकलच्या उद्घाटनानंतर गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi, Minister of State for Railways) यांच्या हस्ते विविध सुविधांचे लोकार्पणही होणार आहे. त्यात वांद्रे स्थानकातील पादचारी पुलाचे उद्घाटन, तसेच विलेपार्ले, अंधेरी, वसई रोड, नालासोपारा, मुंबई सेन्ट्रल, अंधेरी, ग्राण्ट रोड, गोरेगाव स्थानकातील पादचारी पूल, जोगेश्वरी स्थानकातील पादचारी पुलाचा करण्यात आलेला विस्तार या सुविधांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेनंतर (Western Railway) गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल चेन्नईच्या (Chennai) आयसीएफ कारखान्यातून (ICF factory) मध्य रेल्वेच्या (Central Railway) ताफ्यात दाखल झाली आहे. ही लोकल दाखल झाल्यानंतर तिची मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर (Transe Harbour) मार्गावरील ठाणे ते वाशी-पनवेल (Thana to vashi-Panvel) मार्गावर चाचणी (Test) घेण्यात आली असून, याच मार्गावर ही लोकल धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार, या लोकलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर धावत असलेली एसी लोकल ही सुरूवातीला मध्य रेल्वे मार्गावर चालविण्याचं नियोजन होतं. परंतु, पुलाची उंची व तांत्रिक अडचणी (Technical Issues) यामुळं ही पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर सुरू करण्यात आली. तसंच, त्यावेळी ही देशातील पश्चिम रेल्वेची पहिली एसी लोकल ठरली. मात्र, आता मध्य रेल्वे मार्गावरील पुलांची उंची व तांत्रिक अडचणी लक्षात घेत 'भेल' कंपनीनं खास कमी उंचीची एसी लोकल तयार केली असून, या लोकलची उंची १३ मि.मी.नं कमी करण्यात आली आहे.

ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर एसी लोकलच्या दिवसभरात १६ फेऱ्या होणार आहेत. या मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड डीसी-एसी लोकल हटविण्यात येणार आहेत. एसी लोकलच्या मध्ये दोन्ही टोकांना लेडीज डबा (Ladies Coach) आरक्षित ठेवण्यात येणार असून, यामध्ये महिला आरपीएफ पोलीस (RPF Constable) तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. तसंच, या मार्गवर ज्या ठिकाणी दगडफेक होऊ शकतात, अशा संवेदनशील ठिकाणांवर पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

एसी लोकलचं भाडं

  • ठाणे ते वाशी – १३० रुपये
  • ठाणे ते पनवेल – १७५ रुपयेहेही वाचा -

भारत बंद: कांजुरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको

संपामुळे सरकारी बँका सलग ३ दिवस बंदRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा