Advertisement

एमएमआरडीए उभारणार वडाळ्यात बिझनेस हब

मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) वडाळ्यात बिझनेस हब (Business hub) बनविण्यात येणार आहे.

एमएमआरडीए उभारणार वडाळ्यात बिझनेस हब
SHARES

मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) वडाळ्यात बिझनेस हब (Business hub) बनविण्यात येणार आहे. वडाळा (Wadala) येथील मोनोरेलच्या स्थानकाच्या (Monorail Station) जवळ मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हबची (Multi Model Transport Hub) उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळं नरिमन पॉइंट (Nariman Point), वांद्रे कुर्ला संकुल (BKC) आणि वडाळा इथं तिसरं बिझनेस हब उभारण्यात येणार आहेत.

मुंबईतील नरिमन पॉइंट, वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) आणि वडाळा येथील तीनही बिझनेस हब एकामेकांना भविष्यात जोडण्याची एमएमआरडीएची (MMRDA) योजना आहे. मुंबईत मोनो २ मार्गावर धावत आहे. एमएमआरडीएतर्फे चेंबूर ते वडाळा (Chembur to Wadala) हा मोनोरेलचा पहिला टप्पा कार्यन्वित होता. तसंच, वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (Wadala to Sant Gadge Maharaj Chowk) हा दुसरा टप्पाही कार्यन्वित केला. यामुळx मध्यावर्ती असलेल्या वडाळा मोनोरेलच्या (Wadala Monorail) नजीकच बिझनेस हब (Business hub) उभारण्याची योजना आहे.

वडाळ्यामध्ये १५६.५२ हेक्टर जमीन असून, यामधील १८.४४ हेक्टर जमिनीवर ट्रान्सपोर्ट हब (Transport Hub) विकसित करण्यात येणार आहे. यासाठी बेस्टच्या आणिक बस डेपोच्या (Anik Bus Depot) जागेचाही वापर करण्यात येणार आहे. वडाळा ट्रक टर्मिनलच्याजवळ (Wadala Truck Terminal) गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत झोपड्या मोठ्या प्रमाणावर वसल्या होत्या, या झोपड्यांवर एमएमआरडीएनं नुकतीच कारवाई करून, या झोपड्या हटवून जमीन मोकळी केली आहे.

वडाळा अधिसूचित क्षेत्राच्या नियोजनाचे काम सध्या एमएमआरडीएकडं असून, यामध्ये शाळा आणि रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये वडाळा मोनोरेल डेपोच्या (Wadala Monorail Depot) जागी व्यावसायिक उपयोग करण्याचा प्रस्ताव असून, सध्या त्याबाबत विचारविनिमय सुरू असून, त्याची योजना लवकरच मांडण्यात येणार आहे.

आंतरराज्य बससेवेवर नियमन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी आणि इतर राज्यांतील परिवहन, खासगी बससेवा क्षेत्र यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मुंबईमध्ये एक आंतरराज्य बस टर्मिनल (Interstate bus terminal) विकसित होण्याची आवश्यकता आहे.

सर्वंकष परिवहन अभ्यास असवालामधील शिफारसीनुसार, आंतरराज्य बस टर्मिनलच्या बांधकाम आणि विकासासाठी वडाळा ट्रक टर्मिनल (Wadala Truck Terminal) इथं जमिनीचं आरक्षण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर, त्याचा व्यवहार्यता अभ्यास करून विकसित करण्यात येणार आहे. वडाळा ट्रक टर्मिनलसाठी प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं आणि माल वाहतूक उद्योगाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीनं प्राधिकरणानं वडाळा इथं सुमारे ६६ हेक्टर जमिनीवर भारवाहक तळ विकसित व स्थापन करण्याचं काम हाती घेतलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये मूलभूत सोयींचा विकास करण्याचं काम पूर्ण झालं आहे.



हेही वाचा -

'शिवभोजन थाळी'साठी बेस्टच्या २ विशेष बसगाड्या

दारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा