Advertisement

'शिवभोजन थाळी'साठी बेस्टच्या २ विशेष बसगाड्या

राज्य सरकारन (State Government) बेस्टच्या २ फिरत्या कॅन्टीनमध्ये (BEST Moving Canteen) शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

'शिवभोजन थाळी'साठी बेस्टच्या २ विशेष बसगाड्या
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) ‘शिवभोजन थाळी’ (Shiv Bhojan Thali) योजनेला राज्यभरातील लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या दिवशी १३ हजार ५०० थाळ्यांचं वाटप करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day) औचित्य साधून राज्यभरात ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसचं, महाविकास आघाडी सरकारनं (Maha Vikas Aghadi) राज्यभर लागू केलेली ही शिवभोजन थाळी आता बेस्ट बसच्या माध्यमातून मिळणार आहे. 

राज्य सरकारन (State Government) बेस्टच्या २ फिरत्या कॅन्टीनमध्ये (BEST Moving Canteen) शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याआधारे बेस्ट उपक्रमानं २ विशेष बससाठी (Special Bus) आरेखनाचं काम हाती घेतलं आहे. त्यानंतर काही दिवसांतच सुरुवातीला २ बसमध्ये शिवभोजन थाळीची सेवा सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा - कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार

राज्यात वाजतगाजत सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा दावा केला जात आहे. त्या अनुषंगानं सरकारनं बेस्टच्या फिरत्या कॅन्टीनमध्ये (BEST Moving Canteen) त्याचा लाभ देण्याचं ठरविलं आहे. सध्या बेस्टतर्फे काही ठिकाणी बसमध्ये फिरत्या कॅन्टीनची सुविधा दिली जात आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध केले जातात. त्या धर्तीवरच २ बसमध्ये शिवभोजन थाळी योजना राबविली जाणार आहे.

हेही वाचा - 'मुंबईत दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट, मग ऊत येणारच…'

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन (food) उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. राज्यात १२२शिवभोजन केंद्रे (shiv bhojan centers) सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी ११, ४१७ जणांनी या भोजनाचा लाभ घेतला होता.हेही वाचा -

ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर गुरूवारपासून धावणार एसी लोकल

करोना व्हायरसचे ८ संशयित रुग्णालयात, मुंबई विमानतळावर ३९९७ प्रवाशांची तपासणीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा