दारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या

व्यसनाच्या आहारी गेलेला राजेश दारूच्या नशेत त्याच्या पत्नीचा छळ करत असे, वेळप्रसंगी तो तिला मारहाण ही करायचा.

दारूच्या नशेत जावयाने केली मेव्हण्याची हत्या
SHARES

क्षुल्लक कारणांवरून बहिणीला त्रास देत मारहाण करणाऱ्या भावोजीला जाब विचारायला गेलेल्या मेव्हण्याची हत्या करण्यात आल्याची घटना महालक्ष्मी येथे मंगळवारी घडली. विनोद मोखरा असे या मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी राजेश बोराची (४७) याला अटक केली आहे.

हेही वाचाः- दिवाळखोर महाराजा

महालक्ष्मी धोबीघाट येथे राहणाऱ्या राजेशसोबत विनोद याच्या बहिणीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. व्यसनाच्या आहारी गेलेला राजेश दारूच्या नशेत त्याच्या पत्नीचा छळ करत असे, वेळप्रसंगी तो तिला मारहाण ही करायचा. नेहमी दारूच्या नशेत असल्यामुळे राजेश याला महापालिकेतील नोकरी गमवावी लागली. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. रोजच्या त्रासाला कंटाळून तिने दोन्ही भावांकडे राजेशची तक्रार केली. सोमवारी बहिणीला मारहाण केल्याबद्दल विचारणा करण्यासाठी दोघे भाऊ तिच्या घरी गेले. विनोद आणि त्याचा भाऊ गिरीधर या दोघांनी राजेशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

हेही वाचाः- करोना व्हायरसचे ८ संशयित रुग्णालयात, मुंबई विमानतळावर ३९९७ प्रवाशांची तपासणी

विनोद आणि गिरीधर जाब विचारण्यासाठी आल्याने राजेश संतापला आणि घरातील चाकूने त्याने विनोदवर वार केले. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राजेशवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा