'द वाॅल' किंवा भारतीय क्रिकेटचा कणा अशी ओळख असलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील सगळ्यात भरवशाचा फलंदाज म्हणजे राहुल द्रविड. भारताच्या 'फॅब फाईव्ह'चा अविभाज्य हिस्सा असलेल्या राहुलचा इंटरनॅशनल क्रिकेट काऊंन्सिल अर्थात आयसीसीने नुकताच 'हाॅल आॅफ फेम' क्रिकेटर्सच्या यादीत समावेश केला आहे.
तिरूवनंतपुरममध्ये झालेल्या भारतविरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यानच्या पाचव्या वन डे मॅचच्या आधी द्रविडचा या मानाच्या यादीत समावेश करण्यात आला. बीसीसीआयने या छोटेखानी सोहळ्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांच्या हस्ते राहुलला मानाची कॅप सोवण्यात आली.
जुलैत डबलिनमध्ये झालेल्या एका सोहळ्यात आयसीसीने राहुल द्रविड, आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅटींग आणि इंग्लंडची महिला विकेटकिपर बॅट्समन क्लेयर टेलर यांचा 'हाॅल आॅफ फेम'च्या यादीत सामावेश केला होता. त्यानंतर आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात द्रविडने म्हटलं होतं की, आयसीसीच्या 'हाॅल आॅफ फेम'च्या यादीत जागा मिळाल्याचा मला सार्थ अभिमान आहे. सद्यस्थितीत राहुल भारत 'अ' आणि अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक आहे.
आयसीसीच्या 'हाॅल आॅफ फेम' यादीत जागा मिळवणारा राहुल पाचवा भारतीय क्रिकेटर आहे. याआधी बिशनसिंग बेदी, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचा २००९ च्या 'हाॅल आॅफ फेम' यादीत समावेश करण्यात आला होता. तर अनिल कुंबळे यांचा २०१५ मध्ये या यादीत समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा-
भारतीय क्रिकेट संकटात, गांगुलीने लिहिलं 'बीसीसीआय'ला पत्र
रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिलात का?