मुंबई इंडियन्स संघात मलिंगाचं कमबॅक, युवराजलाही मिळाला चान्स

इंडियन प्रीमियर लिगचं यंदा १२ वं वर्ष असून मंगळवारी यंदाच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव जयपूर इथं पार पडला. गेल्यावर्षीप्रमाणे गोलंदाज जयदेव उनाडकट यावेळी देखील ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 'यॉर्करचा बादशहा' लसिथ मलिंगा याचं मुंबई इंडियन्सच्या संघात कमबॅक झालं असून एकेकाळचा 'सिक्सर किंग' युवराज सिंगला देखील मुंबईने चमत्कारीकरित्या आपल्या संघात चान्स दिला आहे.

पुन्हा मैदानात

आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने मलिंगाला गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात स्थान दिलं होतं. परंतू, मलिंगाने पुन्हा एकदा मैदानात उतरून खेळण्यास स्वारस्य दाखवल्याने मलिंगाला मुंबई इंडियन्सने २ कोटीच्या मूळ किमतीत विकत घेतलं आहे.

युवराजला चान्स

तर, दुसऱ्या बाजूला फलंदाजीतील जादू ओसरलेल्या युवराज सिंग याला मुंबई इंडियन्सने आश्चर्यकारकरित्या मूळ किंमतीत म्हणजे १ कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. एकेकाळी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू अशी ओळख असलेल्या युवराजवर लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. मात्र, दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्स संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिलं.

गेल्यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला त्याच्या २ कोटी या मूळ किंमतीत संघात स्थान दिलं होतं. परंतू, युवराजला ८ डावांमध्ये केवळ ६५ धावा करता आल्याने पंजाबनं युवराजला संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा-

पृथ्वी शाॅ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरिजबाहेर

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या