Advertisement

पृथ्वी शाॅ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरिजबाहेर

भारतीय संघाला सध्या चिंता सतावतेय ती सलामीच्या फलंदाजांकडून सुरू असलेल्या 'फ्लाॅप शो'ची. के. एल. राहुल, मुरली विजय सातत्याने अपयशी ठरत असल्याने मुंबईकर पृथ्वी शाॅ याला संघात संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु प्रॅक्टीस सेशनमध्ये घोट्याला गंभीर दुखापत झाल्याने पृथ्वीला या संधीपासून मुकावं लागलं आहे.

पृथ्वी शाॅ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सिरिजबाहेर
SHARES

फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सपाटून मार खावा लागला. यामुळे ४ मॅचच्या या टेस्ट सिरिजमधील चुरस चांगलीच वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला पृथ्वी शाॅ दुखापतीमुळे सिरिजच्या बाहेर झाल्यामुळे भारतीय संघाच्या डोकेदुखतीही वाढ झाली आहे.

का बाहेर?

भारतीय संघाला सध्या चिंता सतावतेय ती सलामीच्या फलंदाजांकडून सुरू असलेल्या 'फ्लाॅप शो'ची. के. एल. राहुल, मुरली विजय सातत्याने अपयशी ठरत असल्याने मुंबईकर पृथ्वी शाॅ याला संघात संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु प्रॅक्टीस सेशनमध्ये घोट्याला गंभीर दुखापत झाल्याने पृथ्वीला या संधीपासून मुकावं लागलं आहे.

पृथ्वीच्या जागी मयंक

पृथ्वीच्या जागी कर्नाटकची रन मशीन मयंक अग्रवाल याला संधी देण्यात आली आहे. २७ वर्षांच्या मयंकने देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंटसोबत इंडिया 'ए' कडून खेळताना सर्वाधिक रन्स केले आहेत. २ वर्षे धावा कुटूनही मयंकच्या पदरी निराशाच पडत होती. परंतु आता भारतीय संघात निवड झाल्याने मयंक पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.हेही वाचा-

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोपRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा