Advertisement

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोप

लाड ने मुंबईकडून खेळताना ४४ प्रथमश्रेणी सामन्यांत ४३ च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतकांची देखील नोंद आहे. लाडने केलेल्या ८८ धावांच्या जोरावरच मुंबईने २०१५-१६ मधील रणजी ट्राॅफी जिंकली होती. याचीही गावस्कर यांनी आठवण करून दिली.

मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत दुजाभाव, सुनील गावस्कर यांचा निवड समितीवर धक्कादायक आरोप
SHARES

मुंबईचे क्रिकेटपटू उत्कृष्ट खेळ खेळतात, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)च्या निवड समितीकडून या क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघात संधी देण्यात येत नाही. निवड समितीतील सदस्य मुंबईच्या क्रिकेटपटूंसोबत जाणीवपूर्वक दुजाभाव करत असल्याचा खळबळजनक आरोप लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी केला आहे.


संधीच नाही

गावस्कर यांनी एका वृत्तपत्रातील स्तंभातून निवड समितीच्या पक्षपातीपणावर ताशेरे ओढले आहेत. आपलं म्हणणं पटवून देताना गावस्कर यांनी सिद्धेश लाड या फलंदाजाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांपासून सिद्धेश शानदार प्रदर्शन करत आहे. तरीही त्याला अजूनपर्यंत इंडिया अ संघातसुद्धा संधी देण्यात आलेली नाही.


लाडची कामगिरी

लाड ने मुंबईकडून खेळताना ४४ प्रथमश्रेणी सामन्यांत ४३ च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतकांची देखील नोंद आहे. लाडने केलेल्या ८८ धावांच्या जोरावरच मुंबईने २०१५-१६ मधील रणजी ट्राॅफी जिंकली होती. याचीही त्यांनी आठवण करून दिली.


मुझूमदारची स्थिती

गावस्कर यांनी दुसरं उदाहरण अमोल मुझूमदार याचं दिलं. मुझूमदार याच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ११ हजार धावा आहेत. तरीही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही. याउलट इतर कुठल्याही राज्याकडून २ किंवा ३ सामने खेळलेल्या खेळाडूलाही राष्ट्रीय संघात सहजपणे प्रवेश दिला जातो. असा आरोपही त्यांनी केला.



हेही वाचा-

अरमान जाफरची मुंबई रणजी संघात निवड

पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा