Advertisement

अरमान जाफरची मुंबई रणजी संघात निवड

मुंबई रणजी ट्राॅफीच्या २०१८-१९ चौथ्या फेरीत गुजरातविरुद्ध सामना खेळत आहे. मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यर याच्या हाती आहे. मुंबईने रणजी ट्राॅफीत आतापर्यंत २ सामने खेळले असून हे दोन्ही सामने अनिर्णीत राहिले आहेत. मुंबई एलिट ग्रुप ए आणि बी च्या १२ व्या क्रमांकावर आहे.

अरमान जाफरची मुंबई रणजी संघात निवड
SHARES

मुंबईकडून रणजी खेळण्याची संधी मिळालेल्या अरमान जाफरला गुरूरातविरूद्धच्या सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. केवळ ४ चेंडू खेळून अरमान शून्य धावांवर बाद झाला.

तिहेरी शतक

काही दिवसांपूर्वीच २० वर्षांच्या अरमानने सी. के. नायडू अंडर-२३ ट्राॅफीत मुंबईकडून खेळताना सौराष्ट्रविरूद्ध तिहेरी शतक झळकावलं होतं. अरमानने ३६७ चेंडूत २६ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ३०० धावा केल्या. त्याचा फाॅर्म पाहून अरमानची मुंबईच्या रणजी संघात निवड करण्यात आली. याआधी अरमान २०१६ मध्ये मुंबईकडून ३ प्रथमश्रेणी सामने खेळला आहे.

मुंबई १२ व्या क्रमांकावर

मुंबई रणजी ट्राॅफीच्या २०१८-१९ चौथ्या फेरीत गुजरातविरुद्ध सामना खेळत आहे. मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यर याच्या हाती आहे. मुंबईने रणजी ट्राॅफीत आतापर्यंत २ सामने खेळले असून हे दोन्ही सामने अनिर्णीत राहिले आहेत. मुंबई एलिट ग्रुप ए आणि बी च्या १२ व्या क्रमांकावर आहे.

मुंबई संघ 'असा':

श्रेयस अय्यर (कर्णधार), धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, जय गोकुल बिष्ट, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, आकाश पार्कर, करश कोठारी, शम्स मुलानी, अखिल हेरवाडेकर, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, अशय सरदेसाई, अरमान जाफर.

हेही वाचा-

मुंबईकर अरमानने झळकावलं दुसरं तिहेरी शतक

प्रशिक्षक पोवार यांनी अपमानास्पद वागणूक दिली, मितालीचा खळबळजनक आरोप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा