Advertisement

पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार

सिडनी मैदानात सुरु असलेल्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय अहवालात तो पहिल्या कसोटी सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचं स्पष्ट झालं.

पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार
SHARES

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामन्यातून भारताचा सलामीचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉनं माघार घेतली आहे. कसोटी सामन्यापुर्वी सिडनी मैदानात सुरु असलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ जखमी झाला आहे. त्यामुळं पृथ्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही.


गुडघ्याला दुखापत

 सिडनी मैदानात सुरु असलेल्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय अहवालात तो पहिल्या कसोटी सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचं स्पष्ट झालं. भारत -ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीला ६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.  लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे  या कसोटीत पृथ्वी शॉचं स्थान निश्चित मानलं जातं होतं. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने फलंदाजी करताना ६९ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, सराव सामन्यातच दुखापत झाल्यामुळं त्याला खेळता येणार नाही. हेही वाचा - 

अरमान जाफरची मुंबई रणजी संघात निवड

प्रशिक्षक पोवार यांनी अपमानास्पद वागणूक दिली, मितालीचा खळबळजनक आरोप
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा