IPL 2021 : लिलावाआधी ‘या’ टीमनं बदललं नाव

इंडियन प्रीमियर लीग २०२१ साठी खेळाडूंचा लिलाव गुरुवारी चेन्नईत होणार आहे. लिलावासाठी सारेच खेळाडू आणि चाहते उत्सुक आहेत. या लिलावात कोणती टीम कोणते खेळाडू खरेदी करणार याची सध्या जोरदार चर्चा आहेत. 

या लिलावाच्या आधीच किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमनं आपलं नाव बदललं आहे. या सिझनपासून या टीमचं नाव पंजाब किंग्स असणार आहे. विशेष म्हणजेपहिल्या सीझनपासून खेळत असूनही पंजाबने एकदाही आयपीएल जिंकलेली नाही. पंजाबच्या टीमकडं आयपीएल लिलावासाठी सर्वात जास्त ५३.२० कोटी रुपये आहेत. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडं ३५.९० कोटी  तर राजस्थान रॉयल्यकडं ३४.८५ कोटी रुपये आहेत.किंग्ज इलेव्हन पंजाबनं या आयपीएलपूर्वी ग्लेन मॅक्सवेलसह नऊ खेळाडूंना सोडले आहे. 

पंजाबने केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, मोहम्‍मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकांदे, रवी बिष्णोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, इशान पोरेल या खेळा़डूंना कायम ठेवलं आहे.  तर ग्‍लेन मॅक्‍सवेल, शेल्‍डन कॉटरेल, करुण नायर, हार्डस विलॉइन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, जिमी नीशाम, कृष्‍णा गौतम, तेजिन्‍दर सिंग या खेळाडूंना सोडण्यात आलं आहे. 


हेही वाचा -

IPL 2021 Auction : लिलाव प्रक्रियेत अर्जुन तेंडुलकरसह २९२ खेळाडू

पुढच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या