Advertisement

पुढच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


पुढच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
SHARES

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या २ कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांना संघात न घेता उमेश यादवला संघात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं ट्विट करत ही माहिती दिली.

भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

उमेश यादव दुखापतग्रस्त होता. मात्र, तो अहमदाबादमध्ये संघात दाखल होणार आहे. त्याची दुखापकृत पूर्णपणे बरी झाली आहे की नाही याचा वैद्यकीय समितीकडून आढावा घेण्यात येईल. त्यानंतर त्याला संघात दाखल केलं .

निवड समितीने ५ नेटमधील गोलंदाज आणि २ राखीव खेळाडूदेखील घेतले आहेत. अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार हे नेटमधील गोलंदाज आहेत तर केएस भरत आणि राहुल चहर हे राखीव खेळाडू असणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा