Advertisement

IPL 2021 auction : लिलाव प्रक्रियेत अर्जुन तेंडुलकरसह २९२ खेळाडू

आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नईत १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण २९२ खेळाडू उतरणार आहेत.

IPL 2021 auction : लिलाव प्रक्रियेत अर्जुन तेंडुलकरसह २९२ खेळाडू
SHARES

आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नईत १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण २९२ खेळाडू उतरणार आहेत.  या लिलावासाठी एकूण १११४ क्रिकेटपटूंनी नोंद केली होती. विविध देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून लिलावासाठी २९२ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. 

लिलावात आठ फ्रेंचायझी एकूण ६१ खेळाडू घेण्यासाठी लिलावात सहभागी होतील. लिलावाच्या यादीमध्ये एकूण १६४  भारतीय तर १२५ विदेशी, असोशिएट देशांच्या तीन खेळाडूंना स्थान मिळालेले आहे. सर्वाधिक २ कोटी इतकी मूळ किंमत असणाऱ्यांमध्ये हरभजन सिंग, केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शाकीब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वूड या खेळाडूंचा समावेश आहे. तर दीड कोटी मूळ किंमत असणारे १२ आणि १ कोटी मूळ किंमत असणारे ११ खेळाडू आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हा संघ १३ खेळाडूंना खरेदी करु शकेल. तर सनरायझर्स हैदराबाद या संघाला फक्त तीन खेळाडूंना खरेदी करता येईल. किंग्स ईलेव्हन पंजाब (KXIP) या टीमकडे सर्वाधिक ५३ कोटी १० लाख रुपयांची राशी असून ते मोठ्या ताकदीने लिलाव प्रक्रियात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तर हैदराबाद संघाकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपयांचे भांडवल असेल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) जवळ एकूण २२ कोटी ७० लाख रुपये असून चेन्नई संघाला एकूण ७ खेळाडू खरेदी करता येतील. चेन्नई सुपर किंग्स या संघाने या वर्षी हरभजन सिंग आणि केदार जाधव या खेळाडूंना आपल्या संघातून वगळले आहे.

यंदा ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्याबरोबरच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या बोलीवर साऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.अर्जुन तेंडुलकरला सर्वाधिक कमी बेस प्राईजमध्ये ठेवण्यात आलं आहे. अर्जुनची बेस प्राईज २० लाख रुपये आहे. मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लाँकेट, जेसन रॉय, मार्क वुड या खेळाडूंना सर्वाधिक बेस प्राईजमध्ये ठेवण्यात आले आहे.



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा