Advertisement

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असतानाच राज्यातील शाळा व कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असतानाच राज्यातील शाळा व कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळं सोमवारपासून राज्याप्रमाणे मुंबईतील महाविद्यालयेही सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, मुंबई महापालिका प्रशासनानं अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे.

मागील १० महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. मुंबईतही १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा होती. तशी तयारीदेखील महाविद्यालय स्तरावर सुरू करण्यात आली. 

मात्र, स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेनं याबाबत निर्णय घेणं अपेक्षित असतं. महापालिकेनं अद्याप याबाबत परिपत्रक काढलेलं नाही. याबाबत आयुक्तांना विचारलं असता, १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा -

केवळ १० जणांच्या उपस्थितीतच शिवजयंती, सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रंगनाथ पठारे यांना जाहीर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा