हार्दिक पंड्या, के. एल. राहुल यांना लोकपालांकडून नोटीस

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर, काही महिन्यांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देखील देण्यात आली. परंतु या दोघांपुढील अडचणी अजून संपलेल्या नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली आहे.

साक्ष देण्यासाठी नोटीस

या प्रकरणी बीसीसीआयनं पांड्या व राहुल यांना तात्पुरतं निलंबित केलं होतं. मात्र, लोकपालांकडून निकाल येण्यापूर्वीच त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. प्रकरणात बीसीसीआयनं पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकली नाही, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील आठवड्यात नोटीस पाठवली असल्याचं लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी सांगितलं. तसंच, 'नियमानुसार मला त्यांची बाजू ऐकावी लागणार आहे. आता साक्ष द्यायला कधी यायचं याचा निर्णय त्यांनी घ्यावा', असं जैन यांनी स्पष्ट केलं आहे.

आक्षेपार्ह विधान

महिलांबाबात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी या दोघांनाही बीसीसीआयनं आस्ट्रेलिया दौऱ्यावर परत बोलवलं होतं. मात्र, त्यानंतर बीसीसीआयनं दोघांनी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली.


हेही वाचा -

दाऊदला दणका, हसीना पारकरच्या घराची १ कोटी ८० लाखांना विक्री

लोकलमध्ये मोबाइल चोरणाऱ्या तरूणीस अटक


पुढील बातमी
इतर बातम्या