लोकलमध्ये मोबाइल चोरणाऱ्या तरूणीस अटक

अफरिन ऐरोली येथे कामाला आहे. कामाला जाण्यासाठी ती कुर्ला ते ठाणे आणि ठाण्याहून ऐरोली असा प्रवास करायची. २८ मार्च रोजी ती नेहमीप्रमाणे लोकलमधून प्रवास करत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अफरिनने तरुणीच्या खिशातला मोबाइल चोरला.

लोकलमध्ये मोबाइल चोरणाऱ्या तरूणीस अटक
SHARES

मुंबईच्या लोकलमध्ये आपण आतापर्यंत मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार अटक झाल्याचं ऐकलं असेल. मात्र लोकलच्या डब्यात प्रवाशांचे खिसेे कापणाऱ्या एका तरुणीस मुंबईच्या रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अफरिन शेख (२५) असं या तरुणीचे नाव असून ती गोवंडीची राहणारी आहे.


खिशातला मोबाइल चोरला

अफरिन ऐरोली येथे कामाला आहे. कामाला जाण्यासाठी ती कुर्ला ते ठाणे आणि ठाण्याहून ऐरोली असा प्रवास करायची. २८ मार्च रोजी ती नेहमीप्रमाणे लोकलमधून प्रवास करत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अफरिनने तरुणीच्या खिशातला मोबाइल चोरला. मात्र मोबाइल खिशातून काढल्याची जाणीव होताच तरूणीने अफरिनला पकडले. त्यावेेेळी अफरिन तरूणीस धक्का देऊन पळू लागली.  त्यावेळी तरुणीने तिचा पाठलाग करत आरडाओरडा केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला पकडले.


जामीनावर बाहेर

अफरिनवर या प्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात ती १५ दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यातून जामीनावर सुटून बाहेर ती आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  तिच्यावर या पूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा -

हसीना पारकरच्या घराची १ कोटी ८० लाखाला विक्री

भंगार विक्रेत्याचं अपहरण करणारे अटकेत





Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा