भंगार विक्रेत्याचं अपहरण करणारे अटकेत

नागपाड्यातल्या भंगार विक्रेत्याचं अपहण करून त्याच्या कुटुंबियांकडं अडिच लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

भंगार विक्रेत्याचं अपहरण करणारे अटकेत
SHARES

नागपाड्यातल्या भंगार विक्रेत्याचं अपहण करून त्याच्या कुटुंबीयांकडं अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रेहमान इकलाक अहमद मोमीन (२६), अजीम अख्तर मोहम्मद रमजान अन्सारी (३५), अबुफैसल नबी सरवर शेख (३४), नौशाद गुलमोहम्मद अन्सारी (३४) अशी या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. 


अडीच लाखांची खंडणी 

नागपाड्यातील कामाठीपुरा ९वी गल्ली इथं इरशाद इस्लाम खान यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. २८ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबीयांना इरशाद यांचं अपहरण करण्यात आल्याचं आरोपींनी सांगितलं. तसंच त्याच्या सुटकेसाठी अडीच लाखांची खंडणी मागितली. या घटनेनंतर इरशाद यांचा भाचा शकिल यानं नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस कामाला लागले. 

मोबाइल लोकेशन ट्रेस

इरशाद यांचं मोबाइल लोकेशन ट्रेस करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. मात्र, चारही आरोपी इतके चतुर होते की, त्यांनी मुंबईतल्या त्यांच्या कुटुंबियांकडं खंडणी न मागता. उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या इरशाद त्यांच्या पत्नीकडे फोन करून पैशांची मागणी केली. 

पोलिसांनी इरशाद यांच्या पत्नीला आलेला नंबरचा माग काढला असता. हा नंबर भिवंडीतील आला असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी भिवंडीतील एका गोडाऊन जवळ सापळा रचून चारही आरोपींना अटक केली आणि तिथून इरशाद यांची सुटका केली.  



हेही वाचा -

राज्यात वीज दरवाढ होणार; वीज नियामक आयोगाची परवानगी

जेव्हा प्रवासी नालासोपाऱ्याऐवजी विरारला उतरतात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा