मुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते

वानखेडे स्टेडियम पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयातील अधिकारी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी (एमसीए) चर्चा करत आहेत. वानखेडे हे इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंड आहे. हे असे स्टेडियम आहे जिथे भारतानं २०११ मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप फायनल जिंकला होता.

वानखेडे स्टेडियमवर पर्यटनाला परवानगी मिळावी यासाठी राज्य पर्यटन मंत्रालयाला एमसीएकडून तत्वत: मान्यता मिळाली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. तथापि, स्टेडियम पर्यटकांसाठी केव्हा उघडले जाईल याबाबत कोणतंही स्पष्टीकरण नाही.

“आम्ही टूरिझम डिपार्टमेंट तर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडिअम पर्यटकांसाठी खुले करावे अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी एकत्र काम करण्याचे मान्य केलेंआहे,' अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते वानखेडे किंवा इतर कोणत्याही योग्य ठिकाणी क्रिकेट संग्रहालयाचीही योजना आखत आहेत. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार (आम्ही) एक क्रिकेट संग्रहालय स्थापन करत आहोत.

आता एमटीडीसीबरोबर भागीदारी केल्यामुळे  मुंबईत येणाऱ्या क्रीडा चाहत्यांसाठी पर्यटन स्थळ म्हणून वानखेडे स्टेडियमची जाहिरात करण्यास आम्हाला आनंद झाला आहे. मुंबई क्रिकेटला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पुढाकार घेतल्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार, असं एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले.


हेही वाचा

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम

आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं मोडला 'हा' विक्रम

पुढील बातमी
इतर बातम्या