Advertisement

आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं मोडला 'हा' विक्रम

बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यानं मोडला 'हा' विक्रम
SHARES

आयपीलच्या १३ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यानं जागतिक विक्रम केला आहे. आयपीएलचा प्रथम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या यांच्यात रंगला असून हा सामना २० कोटी लोक एकाच वेळी पाहत होते. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

'आयपीएलच्या पहिल्या सामन्याने नवा रेकॉर्ड केला आहे. BARC नुसार, अभूतपूर्व प्रतिसादासोबत २० कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशातील स्पोर्टिंग लीगला इतक्या प्रमाणात दर्शक मिळालेले नाहीत. कोणत्याही लीगला सुरुवातीलाच इतका मोठा प्रतिसाद मिळालेला नाही', असं ते म्हणाले आहेत.

१९ सप्टेंबरला झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला होता. महेंद्रसिंग धोनीने मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना हा धोनीचा १००वा विजय ठरला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीने IPLमध्ये कर्णधार म्हणून एकूण १०५ विजय मिळवले आहेत, पण त्यातील ५ विजय त्याने पुणे वॉरियर्स संघासाठी मिळवले होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा