टी-२० वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर, पण भारत, पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटात

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीच नव्हे तर तमाम भारतीयांसाठी मोठी पर्वणी असते. प्रत्येक जण टीव्हीसमोर डोळे लावून भारत-पाकमधील सामना बघत असतो, भारतचं जिंकावा अशी मनोमन प्रार्थना करत असतो. त्यात सामना रंगात आल्यास चाहत्यांची उत्सुकता आणि धडधडही वाढते. हा सामना मग एकदिवसीय असो वा टी-२०, भारत-पाकमधील क्रिकेट सामन्याची सर्वच जण वाट पाहतात. त्यातही टी-२० चा वर्ल्डकप म्हटल्यास ही उत्सुकता आणखी वाढते. पण २०२० मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये मात्र भारत-पाक एकमेकांविरोधात खेळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. कारण नुकत्याच जाहिर झालेल्या २०२० मधील टी-२० च्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान संघाला वेगवेगळ्या गटात समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे साखळी फेऱ्या पार केल्यानंतरच हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मंगळवारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी आयसीसीनं महिला आणि पुरुष टी-२० वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केलं. हे दोन्ही वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवले जाणार आहेत. या वेळापत्रकानुसार २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान हे आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच साखळी गटात एकमेकांसमोर येणार नाही आहेत. तसंच, महिलांचा संघ देखील साखळी फेरी पार केल्यानंतरच आमने -सामने येणार आहेत.

दोन्ही संघ एकाच दिवशी खेळणार

डिसेंबर २०१८ रोजी जाहीर करण्यात आलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाकिस्तान पहिल्या आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानी होता. त्यामुळं टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत या दोन्ही संघांना एकाच गटात खेळवलं जाणार नाही आहेत. मात्र, २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ खेळणार आहेत. परंतू, या दोन्ही संघांचे ठिकाण आणि सामन्यांची वेळ वेगवेगळी असणार आहे. सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. तर त्याच दिवशी पर्थमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे.

पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच २४ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपची सेमी फायनल ११ आणि १२ नोव्हेंबरला ऍडलेड ओव्हलमध्ये होणार असून फायनल १५ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. तसंच, महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ फेब्रुवारीला होणार आहे.

ग्रुप बी : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि २ क्वालिफायर संघ.

ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि २ क्वालिफायरच्या संघ.

भारताच्या पुरुष टीमचं वेळापत्रक

  • २४ ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • २९ ऑक्टोबर- भारत विरुद्ध ए-२
  • १ नोव्हेंबर- भारत विरुद्ध इंग्लंड
  • ५ नोव्हेंबर- भारत विरुद्ध बी-१
  • ८ नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान

भारताच्या महिला टीमचं वेळापत्रक

  • २१ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • २४ फेब्रुवारी- भारत विरुद्ध क्वालिफायर-१
  • २७ फेब्रुवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड
  • २९ फेब्रुवारी- भारत विरुद्ध श्रीलंका

हेही वाचा -

हात हालवत आले, हात हलवत गेले- प्रकाश आंबेडकर

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या