Advertisement

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अंबाती रायडूला गोलंदाजी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. त्यावेळी अंबातीच्या गोलंदाजीतील चेंडू फेकण्याच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता.

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी
SHARES

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अंबाती रायडूला गोलंदाजी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. त्यावेळी अंबातीच्या गोलंदाजीतील चेंडू फेकण्याच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळं भारताच्या प्रासंगिक रणनितीवर मोठा फरक पडणार आहे.


गोलंदाजीची चाचणी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आयसीसीने रायडूला गोलंदाजीची चाचणी देण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. आयसीसीच्या नियमानुसार रायडूने १४ दिवसांमध्ये चाचणी देणं गरजेचं होतं. मात्र, चाचणी न दिल्याने त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे.


फिरकी गोलंदाजीवर आक्षेप

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतरच रायडूच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतल्याचा अहवाल भारतीय संघ व्यवस्थापनाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालात रायडूच्या गोलंदाजीची शैलीबाबत सवाल उपस्थित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बंदी घालण्यात आली असली तरी रायडूला स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये गोलंदाजी करता येणार असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

शिवसेना मोठा भाऊ आहे आणि राहणार- संजय राऊत

चहल-कुलदीप जोडीची 'अशी'ही सेन्च्युरी !



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा