Advertisement

चहल-कुलदीप जोडीची 'अशी'ही सेन्च्युरी !

कुलदीप आणि चहल ही जोडी १०० विकेट घेणारी जोडी ठरली. या जोडीनं २६ एकदिवसीय सामान्यांमध्ये २१.६ च्या सरासरीनं विकेटची सेन्चुरी मारण्याचा विक्रम या जोडीनं नोंदवला आहे.

चहल-कुलदीप जोडीची 'अशी'ही सेन्च्युरी !
SHARES

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू म्हणून सध्या नवारूपाला आलेली जोडी म्हणजे युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडी. या जोडीनं गेल्या काही सामान्यांमध्ये चांगलाच करिष्मा दाखवत भारतीय संघाला फिरकीपटू म्हणून चांगले पर्याय दिले आहेत. तर अशा या जोडगोळीनं आपला करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. या जोडीनं आपल्या नावावर सोमवारी एक नवा विक्रम रचला आहे. कुलदीप आणि चहल ही जोडी १०० विकेट घेणारी जोडी ठरली. या जोडीनं २६ एकदिवसीय सामान्यांमध्ये २१.६ च्या सरासरीनं विकेटची सेन्चुरी मारण्याचा विक्रम या जोडीनं नोंदवला आहे.


विकेटची सेन्च्यूरी

न्यूझिलंड दौऱ्यातही कुलदीप आणि चहलनं चमक दाखवल किवींना चांगलंच हैराण केलं आहे. सोमवारच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलने न्यूझिलंडचा कर्णधार केन व्हिलीयमसची विकेट काढत कुलदीप-चहल जोडीनं विकेटची सेन्च्यूरी साजरी केली आहे. सामन्याच्या १७ व्या षटकात चहलनं टाकलेला चेंडू पुढं येऊन मारण्याच्या नादात व्हिलीयमसने चेंडू थेट मिडविकेटवरील हार्दिक पांड्याच्या हातात देत आपली विकेटही दिली. या क्षणी इकडे न्यूझिलंडचा कर्णधार बाद झाला आणि तिकडे कुलदीप-चहल जोडीनं १०० विकेटचा पल्ला गाठला.


फिरकीपटूच्या जोडीची गरज

भारतीय क्रिकेट संघाला बऱ्याच वर्षांपासून चांगल्या फिरकीपटूच्या जोडीची गरज होती. कुलदीप-चहल या जोडीच्या रूपानं अखेर भारतीय क्रिकेट संघाची ही गरज पूर्ण झाली असून या जोडीनं वेळोवेळी आपली छाम उमटवली आहे. तर याच कामगिरीच्या बळावर या जोडीनं आपलं भारतीय क्रिकेट संघातील स्थानही आता पक्कं केलं आहे. एकदिवसीय सामान्यांबरोबरच टी-२० मध्येही या जोडीचा जलवा नेहमीच पाहायला मिळताना दिसतो. दरम्यान कुलदीपच्या नावावर ३६ एकदिवसीय सामान्यात ७७ विकेटस तर चहलच्या नावावर ३७ सामान्यांमध्ये ६६ विकेटस आहेत.



हेही वाचा -

अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन

चहलची दमदार कामगिरी, आॅस्ट्रेलियाच्या भूमीत विकेटसचा सिक्सर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा