अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह अत्यंत दिमाखात पार पडला. विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसंच इतर क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
  • अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन
SHARE

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह, उद्योगपती ईशा अंबानी आणि उद्योग आनंद पिरामल तसंच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस असे सेलिब्रिटी गेल्या वर्षी, २०१८ मध्ये विवाह बंधनात अडकले. तर हे सर्व लग्नसोहळे शाही विवाह ठरले. या विवाह सोहळ्याकडे जसं सर्वांचचं लक्ष लागलं होतं, तसंच नव्या वर्षात २०१९ मध्ये सर्वांचंच लक्ष लागलं होत ते मुंबईतल्या पहिल्या-वहिल्या शाहीविवाह सोहळ्याकडे. हा लग्नसोहळा होता 'राज'पुत्राचा. म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे आणि प्रसिद्ध डाॅक्टर संजय बोरूडे यांची कन्या मिताली बोरूडे. रविवारी परळमधील सेंट रेजिस हाॅटेलमध्ये 'अमिताली'चा लग्नसोहळा पार पडला आणि हा शानदार लग्नसोहळा सर्वांच्याच लक्षातही राहिला.


विवाह सोहळ्याला ठाकरे कुटुंबीयांची हजेरी


यांना होतं निमंत्रण

राज ठाकरे यांनी अमितच्या लग्नाचं निमंत्रण राजकीय क्षेत्राबरोबर उद्योग आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांना स्वत: जाऊन दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बंधू उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेत राज ठाकरे यांनी त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. अगदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही लग्नाचं निमंत्रण होतं. मात्र त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना मात्र राज ठाकरेंनी वगळंल होतं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते निमंत्रण असताना लग्नाला येणार का याकडेच सर्वांच लक्ष लागलं होतं. तर राजपुत्राच्या लग्नसोहळ्याला राजकीय, उद्योग, सिनेजगतासह अन्य क्षेत्रातील कोणकोणते दिग्गज हजेरी लावणार याबाबत कमालीची उत्सुकता होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार


उद्योगपती रतन टाटा


मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर


दिग्गजांची उपस्थिती

त्यानुसार रविवारच्या विवाह सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर यांच्यासह उद्योगपती रतन टाटा, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अमिर खान, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत नवदांपत्याला आशीर्वाद दिले. मोदी-शाह यांनी निमंत्रण नसल्यानं मुख्यमंत्री आणि इतर भाजपा नेते हजेरी लावणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक लग्नाला उपस्थिती लावत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तर भाजपाच्या आशिष शेलार यांच्यासह अन्यही नेत्यांनी लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवाररिसेप्शनही झालं शानदार

राजपुत्राच्या लग्नसोहळ्याला उद्धव ठाकरे आणि कुटुंबिय येणार का याचीही मोठी चर्चा रंगली होती. त्यानुसार मुहुर्ताची वेळ साधत उद्धव ठाकरे, रश्मि ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी अमित आणि मितालीवर अक्षता टाकत आशीर्वाद दिले. विवाह सोहळ्याबरोबरच अमितालीचा रिसेप्शन सोहळाही तितकाच शानदार आणि चर्चेचा ठरला. कारण जे दिग्गज-सेलिब्रिटी लग्नसोहळ्याला उपस्थिती लावू शकले नाहीत त्यांनी रिसेप्शनला उपस्थिती लावली. त्यातील एक मोठं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन. बच्चन यांच्यासह सलमान खान, शाहरूख खान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, जितेंद्र आदींनीही उपस्थिती लावली.हेही वाचा -

खल्लास गर्ल ईशा कोपीकरचा भाजपमध्ये प्रवेश

Movie Review - मराठमोळ्या 'ठाकरी' विचारांचं मार्मिक चित्रणसंबंधित विषय
ताज्या बातम्या