Advertisement

खल्लास गर्ल ईशा कोपीकरचा भाजपमध्ये प्रवेश


खल्लास गर्ल ईशा कोपीकरचा भाजपमध्ये प्रवेश
SHARES

मॉडलिंग आणि बॉलिवूड क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री ईशा कोपीकरनं रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात ईशाचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे.

भाजपानं रविवारी नवं भारतीय शिववाहतूक संघटनेची घोषणा केली. ईशा कोपीकर या संघटनेची ब्रँड अम्बेसिडर झाली आहे. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तिचं स्वागत केलं. सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश केल्याचा मला आनंद आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. मला दिलेली जबाबदारी कर्तव्य समजून मी पार पाडेन, असं ईशा कोपीकरनं स्पष्ट केलं.

या सोहळ्याला संघटनेचे प्रमुख आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हन उपस्थित होते.

ईशानं आत्तापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड अशा भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १९९८ मध्ये तिनं तामिळ चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर २००० साली फिदा चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. कंपनी चित्रपटातील आयटम साँगनंतर तिला खल्लास गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 'रब ने बना दी जोडी', 'एक विवाह ऐसा भी', 'राईट या राँग', 'डरना जरुरी है', 'क्या कुल है हम' यांसारख्या चित्रपटात तिनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता राजकारणात ईशाची जादू चालते की नाही हे येत्या काळात सिद्ध होईल.


हेही वाचा

आम्ही काय मॅरेज ब्युरो उघडलाय का? संजय राऊतांचा पुन्हा भाजपाला टोला

ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला उच्च न्यायालयाची नोटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा