Advertisement

ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला उच्च न्यायालयाची नोटीस

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला नोटीस बजावली आहे. तर त्याचवेळी राज्य सरकारला यावर उत्तर देण्याचेही आदेश दिले आहेत.

ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला उच्च न्यायालयाची नोटीस
SHARES

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरूवारी न्यायालयानं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला नोटीस बजावली आहे. तसंच यावर उत्तर देण्याचे आदेशही राज्य सरकारला दिले असून या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती याचिककर्ते भगवानजी रयानी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. 


महापौर निवासात होणार स्मारक

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या महापौर निवासात उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी नुकताच राज्य सरकारने १०० कोटींचा निधी मंजुर करत स्मारकाच्या कामाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)वर टाकली आहे. तर नुकतंच स्मारकाचं भूमिपूजनही करण्यात आलं आहे. त्यामुळे आता लवकरच एमएमआरडीएकडून स्मारकाच्या कामासाठी निविदा काढत कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. असं असताना राष्ट्रीय स्मारक समितीला न्यायालयानं नोटीस बजावली आहे. 


स्मारकाचं काम थांबवण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि केंद्र सरकारच्या एका निर्णयानुसार सरकारी मालकीच्या जागेवर कुठलंही स्मारक उभारता येत नाही. असं असताना महापौर निवासावर बाळासाहेबांचं स्मारक कसं उभारलं जाऊ शकत असा प्रश्न उपस्थित करत भगवानजी रयानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्मारकाला विरोध करत त्यांनी हे स्मारकाचं काम थांबवण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीला नोटीस बजावली आहे. तर त्याचवेळी राज्य सरकारला यावर उत्तर देण्याचेही आदेश दिले आहेत.


हेही वाचा -

आम्ही काय मॅरेज ब्युरो उघडलाय का? संजय राऊतांचा पुन्हा भाजपाला टोला

अपघातग्रस्तांच्या मदतीला आता पश्चिम रेल्वेची 'आझाद ब्रिगेड'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा