Advertisement

अपघातग्रस्तांच्या मदतीला आता पश्चिम रेल्वेची 'आझाद ब्रिगेड'


अपघातग्रस्तांच्या मदतीला आता पश्चिम रेल्वेची 'आझाद ब्रिगेड'
SHARES

रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला सरासरी ११ ते १२ जणांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात होतं असताना रेल्वे मात्र अशा घटना रोखण्यात अपयशी ठरलं आहे. मुळात अनेक रेल्वे स्थानकांवर अपघातग्रस्तांना तातडीनं वैदयकीय मदत मिळत नसल्यानं अपघातग्रस्तांचा मृत्यू होत असल्याचं धक्कादायक वास्तव आहे.

पण आता उशीरा का होईऩा पण रेल्वे प्रशासनाला जाग आली असून रेल्वे अपघात रोखण्यासाठी आता पश्चिम रेल्वे पुढे सरसावली आहे. पश्चिम रेल्वेनं रेल्वे अपघात रोखण्यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना आणली आहे आणि ती म्हणजे 'आझाद ब्रिगेड'ची. चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वेकडून आझाद ब्रिगेड नेमण्यात येणार असून ही ब्रिगेड अपघातग्रस्तांना त्वरीत वैदयकिय मदत पुरवणार आहे.

असं सुचलं आझाद ब्रिगेड नाव

विलेपार्ले स्थानकाचे डेप्युटी स्टेशन मॅनेजर अशोक आझाद यांच्या नावावरून रेल्वेनं आझाद ब्रिगेड हे नाव ठेवलं आहे. १८ मे २०१७ रोजी एका जखमी प्रवाशाला मदत करताना लोकलचा धक्का लागून अशोक आझाद यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ या मदत पथकाचं नाव आझाद ब्रिगेड असं ठेवण्यात आलं.


जखमींना मिळणार वेळेत उपचार

रेल्वे अपघातात जखमींना वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू पावणाऱ्यांची संख्या हजारोंचा घरात आहे. ही आकडेवारी पाहता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तातडीनं पावलं उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पश्चिम रेल्वेनं प्रत्येक स्थानकावर एक मदत पथक स्थापन करणार आहे. या पथकात चार मदतनीस नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कर्मचारी जखमी प्रवाशाला गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवणार.


पावणेदोन कोटींचे टेंडर मंजूर

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चर्चगेट ते डहाणू एकूण ३७ रेल्वे स्थानक आहेत. प्रत्येक स्टेशनवर चार मदतनीस म्हणजे ३७ स्टेशनसाठी १४८ मदतनीस भरती करण्यात येतील. प्रत्येक स्टेशन मास्तरांच्या हाताखाली हे कर्मचारी कार्यरत असतील. यासाठी २ कोटी ७५ लाखांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे.


हेही वाचा

बेरोजगारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४ लाख पदांची मेगाभरती

मध्य रेल्वेवर २४ आणि २६ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लाॅक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा